घरक्राईमनामाऑनलाईन ड्रायव्हरनेच 'डल्ला' मारला

ऑनलाईन ड्रायव्हरनेच ‘डल्ला’ मारला

परळमधील कार चोरीचा पर्दाफाश

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बोलावलेल्या चालकानेच मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत कार चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परेल भागातून चोरीला गेलेली मारुती वॅगनआर अवघ्या काही दिवसांत भोईवाडा पोलिसांनी शोधून काढली असून, फैजान अबसार अहमद शेख (वय ३५) या आरोपीला अटक केली आहे.
तक्रारदार डॉ. प्रतिक राजन मुणगेकर (वय ३१) हे परेल येथील इंडिया युनायटेड मिल्स चाळ परिसरात राहतात. १० जून रोजी रात्री त्यांनी आपली मारुती वॅगनआर (क्र. एमएच-०१-ईव्ही-२६७७) घराबाहेर पार्क केली होती. मात्र, सकाळी उठल्यावर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
बोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

अणुकरारापूर्वीच इराणला ९ अब्ज डॉलर्स

भारताकडून हार, पाकिस्तानला दंड

‘दिशा’ने दाखवली वाट; भारतीय जहाजाने सुरक्षित ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

तपासादरम्यान, डॉ. मुणगेकर यांना गाडी चालवता येत नसल्याने ते नेहमी ऑनलाईन चालकांची मदत घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी गेल्या वर्षभरातील सर्व चालकांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये एका चालकाचे लोकेशन गुन्हा घडला त्या वेळी घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी फैजान शेख याचे लोकेशन उल्हासनगरमध्ये असल्याचे शोधून काढले. तिथे दोन दिवस सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने गुन्हा कबूल केला असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली कार हस्तगत करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त मनोजकुमार शर्मा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. सचिन बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version