घरक्राईमनामापादचाऱ्यांवर मूत्राने भरलेली बाटली फेकणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

पादचाऱ्यांवर मूत्राने भरलेली बाटली फेकणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

बोरिवलीत घडली घटना, आमदार संजय उपाध्याय यांनी घेतली गंभीर दखल

बोरिवलीतील एका पुलाच्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यांवर मूत्राने भरलेली पाण्याची बाटली फेकणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर मुस्लिम व्यक्ती पाण्याच्या बाटलीत मूत्रविसर्जन करून त्या बाटल्या पुलाखालून जाणाऱ्या पादचाऱ्यांवर फेकत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला पुलावरून चालणाऱ्या लोकांनी हटकले आणि त्याला तडाखाही दिला.

सदर व्यक्तीविरोधात लोक संतप्त झाले होते. स्थानिक आमदार संजय उपाध्याय हेदेखील तिथे उपस्थित होते. त्यावेळी या विकृत व्यक्तीच्या या कृत्याबद्दल लोकांच्या भावना आमदारांनी जाणून घेतल्या.

हे ही वाचा:

‘सौदी अरेबियात व्यावसायिक प्रदर्शनात हिंदू व्यावसायिकावर धर्मावरून डिवचले?’

भारताला कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्याची मुभा!

अल-फलाह विद्यापीठाच्या अध्यक्षांना अटक; काय आहे प्रकरण?

गोवा विशेष : आता काही महिने नाही, वर्षभर पर्यटन!

सदर व्यक्तीचा या कृतीमागे कोणता उद्देश आहे, हे आता पोलिस चौकशीत समोर येईल. सध्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भातील एक व्हीडिओ व्हायरल झाला असून लोक संतापाने त्या व्यक्तीला जाब विचारत असल्याचे व्हीडिओत दिसते आहे. त्यावेळी आमदार संजय उपाध्याय हेदेखील तिथे उपस्थित असल्याचे दिसते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version