घरक्राईमनामाभायखळ्यात मोहरमच्या जुलूसमध्ये वाटल्या विषारी कॅप्सूलचे; एक गंभीर

भायखळ्यात मोहरमच्या जुलूसमध्ये वाटल्या विषारी कॅप्सूलचे; एक गंभीर

कटकारस्थान रचल्याचा संशय

भायखळा परिसरात मोहरमच्या जुलूसदरम्यान संशयास्पद कॅप्सूलचे वाटप करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने या कॅप्सूल वेदनाशामक असल्याचा दावा केला होता. मात्र, कॅप्सूलचे सेवन केल्यानंतर एका व्यक्तीला उलट्या व अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत उर्वरित कॅप्सूलचे वाटप थांबवले आणि मोठ्या प्रमाणात कॅप्सूल जप्त केल्या.

माहितीनुसार, शुक्रवारी भायखळ्यातील अंजीरवाडी–सीताफळवाडी मार्गावर निघालेल्या मोहरमच्या जुलूसमध्ये संबंधित इसम मोफत कॅप्सूल वाटत होता. त्या वेदनाशामक असल्याचे सांगून तो लोकांना त्या घेण्यास प्रवृत्त करत होता. यापैकी एका व्यक्तीने कॅप्सूल घेतल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या कॅप्सुलमध्ये उंदीर मारण्याचे औषध असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

टीईटी परीक्षेचा पेपर फुटला; शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

उद्धव ठाकरेंनी दिलेली चांदीची वीट गायब नाही…ती सुरक्षितच!

भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा

पुढील वर्षाच्या प्रारंभी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार?

या घटनेनंतर नागरिकांनी भायखळा पोलिसांकडे धाव घेतली. पीडिताच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडून जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमध्ये राखाडी रंगाची पावडर आढळली असून, ती आयुर्वेदिक औषधी असल्याचा दावा तो करत आहे. या पावडरमुळे वेदना कमी होतात, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

मात्र, कॅप्सूलमधील पदार्थ नेमका काय आहे, त्यात अमली पदार्थ किंवा अन्य घातक रसायनांचे मिश्रण आहे का, याबाबत खात्री करण्यासाठी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या पावडरमध्ये अमली पदार्थांचे अंश असण्याची शक्यता तपासली जात आहे. या कॅप्सूल कुठून आणल्या, त्यांचा पुरवठादार कोण आहे आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, अनोळखी व्यक्तींकडून कोणतीही औषधे किंवा खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version