घरक्राईमनामाकॉमेडियन कपिल शर्माला खंडणीची धमकी; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपी पश्चिम बंगालमधून...

कॉमेडियन कपिल शर्माला खंडणीची धमकी; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपी पश्चिम बंगालमधून जेरबंद

गुन्हे शाखेची मोठी कारवाई

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माला धमकी देत तब्बल १ कोटींची खंडणी मागणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पश्चिम बंगालमधून दिलीप चौधरी याला ताब्यात घेत मुंबईत आणण्यात आले असून, न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत डांबले आहे.

२२ ते २३ सप्टेंबरदरम्यान कपिल शर्माला आरोपीने सात वेळा फोन करून धमक्या दिल्या. एवढ्यावरच थांबून न राहता आरोपीने व्हिडिओ पाठवूनही दहशत माजवली. धमकी देताना त्याने कुख्यात गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा आधार घेतला होता.

हे ही वाचा:

वांगचूकला अटक, ‘गीतांजली’च्या भोवतीही संशयाचे धुके

अराजकता सहन केली जाणार नाही

बरेली दंगल प्रकरणी मौलाना तौकीर रझा अटकेत

षष्ठ्यब्दीपूर्ति निमित्त सुनील देवधर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू करताच आरोपीचा ठावठिकाणा मिळवला आणि पश्चिम बंगालमधून गुप्त कारवाई करत त्याला जेरबंद केले. आरोपीचे या गुंडांशी प्रत्यक्ष संबंध आहेत की फक्त त्यांच्या नावाचा वापर करून खंडणी वसुलीचा डाव रचला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version