घरक्राईमनामाअंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका

अंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई करत डान्स बारवर छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १७ मुलींची सुटका केली. बारच्या मॅनेजर आणि कॅशियरसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एनजीओच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

कोरोना काळात या डान्सबारमध्ये खुलेआम नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार एका एनजीओच्या वतीने करण्यात आली होती. डान्स बारमधील कारवाई दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार बार गर्ल्सना बारच्या तळघरात ठेवण्यात आले होते. तेथून १७ मुलींना ताब्यात घेण्यात आले. हा बार नियमाविरुद्ध रात्रभर सुरु असायचा आणि त्याबद्दल स्थानिक अंधेरी पोलिसांना याची माहिती मिळालेली नव्हती. पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे पथक शनिवारी रात्री ११.३० ते १२.३०च्या सुमारास छापा मारण्यासाठी पोहोचले.

हे ही वाचा:

‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक

श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या

प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण

पोलिसांच्या छाप्याला घाबरून या मुली तळघरातील गुप्त खोलीत लपल्या होत्या. जेव्हा संपूर्ण पोलीस दल आणि एनजीओचे लोक बारमध्ये पोहोचले, तेव्हा लोक मेकअप रुममध्ये गेले आणि तिथे त्यांना मोठा आरसा दिसला. काहीतरी संशयास्पद वाटल्यामुळे एनजीओच्या टीमने हा आरसा हटवला असता आरशाच्या मागे असलेली गुप्त खोली पोलिसांना दिसली. या खोलीत जाऊन पाहिले असता १७ बार बाला येथे लपून बसल्या होत्या. या सर्व बार बालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुप्त तळघरात एसी, बेड अशा सर्व सुविधा होत्या, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version