घरक्राईमनामापूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?

गेले काही महिने राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. पण आता या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती एक महत्त्वपूर्ण पुरावा लागला असून यामुळे शिवसेना नेते माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीने पुणे येथे इमारतीतून खाली उडी मारत आत्महत्या केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी प्रकाशझोतात आले होते. या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने राज्यभर खळबळ माजली होती. पूजा चव्हाण हिचे राठोड यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप यावेळी झाले होते. पूजा चव्हाण हिच्या टेलिफोन संभाषणाच्या काही ध्वनिफिती माध्यमांमध्ये समोर आल्या होत्या आणि ते संभाषण राठोड यांच्या सोबतचे असल्याचे म्हटले गेले होते. हे सारे प्रकरण शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर चांगलेच शेकले असून त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते.

हे ही वाचा:

मराठीचे खरे मारेकरी…ही पेंग्विन सेना!

भारतीय महिला हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी! उपांत्य फेरीत धडक

…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’

कोरेगाव भीमा खटल्यावरून न्यायमुर्ती शिंदेंना हटवण्याची मागणी! वाचा काय आहे कारण

आपल्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती या प्रकरणाशी संबंधित एक नवा पुरावा आल्याची माहिती मिळत आहे. हा नवा पुरावा म्हणजे पूजा चव्हाण हिचे आणखीन एक कॉल रेकॉर्डिंग आहे. हे कॉल रेकॉर्डिंग देखील माजी मंत्री संजय राठोड यांच्या सोबतच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या पाच ते सहा दिवस आधीचे हे कॉल रेकॉर्डिंग असून जवळपास ९० मिनिटांचे हे संभाषण असल्याचे म्हटले जात आहे. द इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version