घरक्राईमनामासाहिलला परीक्षागृहातून बाहेर नेल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

साहिलला परीक्षागृहातून बाहेर नेल्याचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

तपास सुरू

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. परीक्षागृहातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून, त्यात साहिल याला परीक्षेदरम्यान प्रश्न विचारण्यात आल्याचे आणि त्यानंतर परीक्षागृहाबाहेर नेण्यात आल्याचे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या फुटेजची तपासणी सुरू आहे.

१८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.३० ते १२.४५ या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, या फुटेजमध्ये साहिल आपल्या खिशातील एका वस्तूकडे पाहताना दिसत आहे. त्यानंतर एक प्राध्यापक त्याच्याजवळ येतात आणि त्याला इतर विद्यार्थ्यांपासून बाजूला घेऊन जातात. पुढे साहिल याला परीक्षागृहातून बाहेर जाण्यास सांगितल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याचे वृत्त आहे.

गुन्हे शाखा केवळ परीक्षागृहातील फुटेजच नव्हे, तर आयआयटी मुंबईच्या परिसरातील आणि वसतिगृहातील सीसीटीव्ही चित्रणही तपासत आहे. परीक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर साहिल कॅम्पसमधून जात सुमारे दुपारी १.२५ वाजता आपल्या वसतिगृहातील खोलीत पोहोचल्याचे फुटेजमधून दिसत असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर तो खोलीबाहेर गेल्याचे दिसले नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

छत्रपती संभाजीनगरमधून ४,७६५ किलो भेसळयुक्त ‘मावा’ जप्त

माध्यमांच्या प्रवेशबंदीनंतर व्हाइट हाऊसकडून ‘ट्रम्प टीव्ही’

भारत इंडो-पॅसिफिकमधील उदयोन्मुख महासत्ता!

सिम कार्डच्या गैरवापरावर ३ वर्षांचा तुरुंगवास

साहिल हा आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. परीक्षेदरम्यान मोबाईल फोनचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. संस्थेच्या यापूर्वीच्या निवेदनानुसार, त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’वर टाकून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संस्थेने नंतर या प्रकरणातील घटनांबाबत तपास पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे सांगत आधीचे निवेदन मागे घेत माफी मागितली.

या प्रकरणात जातीवरून साहिलचा छळ केला जात असल्याचा आरोप केला गेला. काही लोकांनी जातीयवादातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करत प्रोफेसर दुल्ला याचा राजीनामा मागितला. दुल्ला यांना निलंबित करण्यात आले आहे. पण साहिल याने कॉपी केली नसून त्याला अडकवण्यात आल्याचाही आरोप केला. आता सीसीटीव्हीतून सत्य बाहेर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागणार आहे.

दरम्यान, साहिल याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परीक्षागृहात नेमके काय घडले, संस्थेकडून कुटुंबाला कोणती माहिती देण्यात आली आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणाची जबाबदारी निश्चित होते, याची चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version