घरक्राईमनामाशाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

मुंबईच्या विशेष न्यायालयाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. आज सकाळीच अभिनेता शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खान याला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहचला आहे.

कोरोना काळात खबरदारी म्हणून कारागृहातील कैद्यांना भेटण्यास बंदी होती. मात्र, आजपासून हे सर्व निर्बंध शिथिल करून नियमांचे पालन करून कैद्यांना भेटण्याची नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खान हा आपला मुलगा आर्यन खान याला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात दाखल झाला आहे. तीन आठवड्यांनी शाहरुखने आर्यनची भेट घेतली. सुमारे १० ते १५ मिनिटांसाठी शाहरुखने आर्यनची भेट घेतली.

हे ही वाचा:

आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

क्रूझवरील पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवरील ड्रग्स पार्टी उधळत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश होता.

आर्यन खान सोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले आहेत. त्यानंतर आर्यन खानची याचिका तातडीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र, काल कोर्टाच्या कामाची वेळ संपल्याने त्यावर आज सुनावणी होणे अपेक्षित आहे. आर्यन खानला जामीन मिळतो का यावर सर्वांचेच लक्ष असेल. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version