घरक्राईमनामाभारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!

भारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!

पोलिसांकडून तपास सुरु

परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला आपल्या पतीसोबत झारखंडमधील दुमका येथे पोहोचली होती.या ठिकाणी सुमारे ८-१० आरोपींनी मिळून त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केला.याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुमहाट येथील आहे. स्पेनमधील एक महिला येथे भेट देण्यासाठी आली होती. ही घटना गेल्या शुक्रवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेसोबत तिचा नवराही होता. सर्वजण दुचाकीवरून भागलपूरच्या दिशेने निघाले होते.

हे ही वाचा:

बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

भाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता

‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’

आसाराम बापू तुरुंगातच राहणार

पती-पत्नी परदेशातून टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. हे लोक स्पेनच्या आधी पाकिस्तानात गेले. त्यानंतर पाकिस्तानातून बांगलादेश आणि नंतर बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोहोचले.हे जोडपे दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावात तंबूत थांबले होते. दोघांना झारखंडमधून नेपाळला जायचे होते.त्यादरम्यान रात्री १० वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रथम महिलेला मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघानांही सरैयाहाट रुगालयात दाखल करण्यात आले आहे.सरैयाहाट रुग्णालयाबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version