घरक्राईमनामादारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

दारूच्या नशेत मुलीला फरफटत नेलेला रिक्षाचालक अटकेत

ठाण्यात रिक्षाचालकाने एका मुलीला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. पण ठाणे पोलिसांनी २४ तासांत त्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

राजू आब्बायी विरांगनेलू असं या आरोपी रिक्षाचालकाचं नाव असून, तो दिघा भागात राहणारा आहे. शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी एक विद्यार्थिनी बाजारपेठेतून चालली होती. त्यावेळेस या रिक्षाचालकाने तिच्याकडून पाहून अश्लील हावभाव केले. यावर मुलीने त्याला जाब विचारायचा आणि त्या चालकाला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करून तिचा हात पकडून तिला फरफटत नेलं. फरफटत नेल्याने मुलीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालक स्थानकाच्या दिशेनं फरार झाला. घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

हे ही वाचा:

शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक संजय वाघुले त्या परिसरात होते. त्यांना घडलेला प्रकार समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांशी पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर या मुलीसोबत जाऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा नंबर मिळवला आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. २४ तासांत पोलिसांनी या आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. आरोपी रिक्षाचालकाने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. या रिक्षाचालकावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version