घरक्राईमनामाकुवेतला जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन महिलांना विमानतळावर अडवले

कुवेतला जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन महिलांना विमानतळावर अडवले

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. वर्क व्हिसामध्ये छेडछाड करून कुवेतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन महिलांना अडवण्यात आले आहे. पारपत्र विभाग व इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिला प्रवासी विमला अक्काबटुला, नलिनी पैला आणि मार्था कंडेली या तीन महिला शुक्रवारी रात्री ओमान मार्गे कुवेतमध्ये जाणाच्या प्रयत्नात होत्या. ओमानची राजधानी मस्कतला त्या जात होत्या. तेथे तैनात विशेष शाखेच्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता तिन्ही महिला प्रवासी व्हिसावर ओमानला जात होत्या. त्यांची अधिक चौकशी केली असता कुवेतमध्ये वर्क व्हिसाच्या जुन्या नोंदी आढळल्या. तसेच नुकताच त्यांचा वर्क व्हिसा रद्द करण्यात आल्याचे दिसून आले.

हे ही वाचा..

दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर

वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?

त्यांच्या पारपत्रकावर अशा याबाबतच्या नोंदींमध्ये बदल करण्यात आल्याचे आढळले. त्यावर महिला ओमानमध्ये प्रवासी व्हिसावर जाऊन तेथून कुवेतमध्ये बेकायदेशीरपणे नोकरीसाठी जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून याप्रकरणी पारपत्रामध्ये छेडछाड करून पारपत्र विभाग व इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version