घरक्राईमनामामुंबईत अत्याधुनिक पिस्तुलांसह दोघांना अटक

मुंबईत अत्याधुनिक पिस्तुलांसह दोघांना अटक

बिष्णोई टोळीशी संबंध असल्याची शक्यता

अत्याधुनिक पिस्तुलची विक्री करण्यासाठी आलेल्या पंजाबच्या दोन गुन्हेगारांना मुंबईतील वाडीबंदर येथून मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथका कडून अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून टर्किश बनावटीचे दोन अत्याधुनिक पिस्तुल ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

रणजित सिंग (३६) आणि अमृत पालसिंग (२३) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. मूळचे पंजाब राज्यातील असणारे दोघे लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी काम करीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती
नुसार मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात आणि पथकाला गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहितीवरून मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पी.डीमोलो रोड,वाडीबंदर येथील कल्याण स्ट्रीट येथे दोन संशयित इसम शस्त्रविक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

हे ही वाचा:

‘पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही…’आंदोलकांची घोषणा

सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला; निफ्टी २३,९०० च्या खाली

मेसी-रोनाल्डोसारखी प्रतिस्पर्धा पुन्हा होणार नाही!

“आमचे राजकारण तोडण्यासाठी नव्हे, तर जोडण्यासाठी”

या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय तरळपट्टी,पोलीस निरीक्षक अरुण थोरात आणि पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या सामानाची तपासणी केली असता दोघांच्या बॅगेत प्रत्येकी एक-एक पिस्तुल आणि ५० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेले पिस्तुल टर्की बनावटीचे असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) राजतिलक रोशन यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दोघांवर पंजाबमध्ये हत्येचा प्रयत्न आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल आहे. जे दोघे मुंबईतील गुंड टोळीला पिस्तुल विक्री करण्यासाठी आले होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे दोघे लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची शक्यता असून या अनुषंगाने तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version