घरक्राईमनामाहल्लेखोरांनी पल्सर दुचाकी पितृपक्षापूर्वी घेतली...रोख पैसेही दिले

हल्लेखोरांनी पल्सर दुचाकी पितृपक्षापूर्वी घेतली…रोख पैसेही दिले

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकीच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोरांनी पळ काढण्यासाठी वापरलेली ही पल्सर दुचाकी काल रात्री उशिरा अंधेरी (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही दुचाकी ताब्यात घेतली आणि पुढील कारवाईसाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आणली.

हे ही वाचा:

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपी शूटरचा फोटो समोर

एकनाथ शिंदेंनी केली टायगर श्रॉफची विचारपूस

तीन वेळा दुचाकीची खरेदी-विक्री…

पोलिसांनी दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरून तपास केला असता, वाहनाच्या मालकी हक्काबाबत महत्त्वाची साखळी समोर आली आहे. या दुचाकीचा पहिला मालक जोगेश्वरी परिसरातील रहिवासी होता. त्याने ही गाडी दुसऱ्या एका व्यक्तीला विकली होती. त्यानंतर संबंधित दुसऱ्या व्यक्तीने ती तिसऱ्या मालकाला विकली.

तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पितृपक्षापूर्वी या तिसऱ्या मालकाकडून ही पल्सर दुचाकी खरेदी केली होती. गाडीची संपूर्ण रक्कम तिसऱ्या मालकाला रोख स्वरूपात अदा करण्यात आली होती; मात्र वाहनाच्या कागदपत्रांचे अधिकृत हस्तांतरण (ट्रान्सफर) अद्याप झाले नव्हते. नवरात्रोत्सवानंतर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरले होते. कागदपत्रांची देवाणघेवाण होण्यापूर्वीच हल्लेखोरांनी या दुचाकीचा वापर गोळीबाराच्या गुन्ह्यासाठी केल्याचे उघड झाले आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आता हल्लेखोरांच्या नेमक्या माग काढण्याच्या दिशेने पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version