घरक्राईमनामाउज्जैनमधील १२ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणी ऑटोचालकासह तिघे अटकेत!

उज्जैनमधील १२ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणी ऑटोचालकासह तिघे अटकेत!

बलात्कार करून मुलीला फेकले होते रस्त्यावर

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत असल्याचे एका सीसीटीव्ही फुटेज दिसली होते.याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटो चालकासह अन्य तिघांना अटक केली आहे.ऑटोवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

मध्य प्रदेश शहरातील दांडी आश्रमाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला फेकण्यात आले होते.पीडित मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत होती.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते.याप्रकरणी पोलिसांकडून एका ऑटो चालकाला अटक करण्यात आली, तर इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी मदतीची याचना करत रस्त्यावर फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्यानंतर आमच्या पथकाने ८ किमी अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्याआधारे एका ऑटो चालकाला अटक करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, राकेश (३८) असे अटक केलेल्या ऑटोचालकाचे नाव आहे.

हे ही वाचा:

जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

फरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!

पोलिसांनी सांगितले, प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की,पीडित मुलगी जीवन खेरी येथे एका ऑटोमध्ये बसली होती.त्यानंतर पथकाने ऑटोचा शोध घेतला. ऑटोवर रक्ताचे डागही आढळून आले असून ऑटोची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य तिघांपैकी एक ऑटोचालकही आहे.मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

 

 

याप्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता आणि पीडित मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत होती.रक्तस्राव झालेल्या मुलीचा रस्त्यावरून चालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.पीडित मुलीवर बुधवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली आणि तिची प्रकृती चिंताजनक परंतु स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी महाकाल पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू आहे.तसेच याप्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आल्याचे, अधिकाऱ्याने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version