घरक्राईमनामाभायखळ्यात पायात गोळी लागून युवक जखमी

भायखळ्यात पायात गोळी लागून युवक जखमी

उपचार सुरू

भायखळा परिसरात मंगळवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. डॉकयार्ड रोड परिसरात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात समीर आसिफ शेख (३८) हा युवक जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख यांच्या पायात एक गोळी लागली. घटनेनंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

“शिवाजीही आमचे आणि औरंगजेबही आमचे”

बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली

सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या नोमान अलीने रचला इतिहास

गोळीबाराची माहिती मिळताच भायखळा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version