घरधर्म संस्कृतीवादग्रस्त हुमायून कबीर आता नवे मुख्यमंत्री शुभेंदूना देतायत धमकी

वादग्रस्त हुमायून कबीर आता नवे मुख्यमंत्री शुभेंदूना देतायत धमकी

शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक विरोधक हे उद्विग्न झालेले आहेत. त्यातून हुमायून कबीर या तृणमूलच्या माजी नेत्याने शुभेंदू यांना मारण्याची धमकी दिली आहे. बाबरी मशीद बांधण्याचा निश्चय करणाऱ्या कबीरने बांगलादेशच्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही धमकी दिली आहे.

हुमायून कबीर यांनी बांगलादेशी मीडिया चॅनल ‘फेस द पीपल’ ला दिलेल्या मुलाखतीत शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात उघड धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही वक्तव्ये शुभेंदू अधिकारी यांनी ९ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांतच आली आहेत.

हे ही वाचा:

अशी गाठली चांदीने ऐतिहासिक उंची

हिमंता बिस्वसर्मा झाले भाजपा, एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते

सत्तापालट ?  नव्हे, हे तर बंगाल चे सांस्कृतिक पुनर्जागरण

प्रोजेक्ट कुडनकुलम: आत्मनिर्भर अणुक्रांती

अँकर शफिउल सगर यांच्याशी बोलताना हुमायून कबीर यांनी विधानसभेतील आणि बाहेरील संघर्षांचा उल्लेख करत आक्रमक भूमिका घेतली. कबीर म्हणाले, “विधानसभेत आणि बाहेर शुभेंदू अधिकारी यांना आव्हान देणारा फक्त हुमायून कबीर होता. मी आधीच सांगितले होते की, जर तुम्ही कोणत्याही मुस्लिम आमदाराला हात लावला तर मी तुम्हाला मारहाण करीन.”

यानंतर त्यांनी आणखी तीव्र वक्तव्य करत म्हटले, “जर सुवेंदू कोणत्याही मुस्लिमाला हात लावतील, तर आम्ही सुवेंदूलाही मारू.”

मुख्यमंत्र्यांविरोधातील ही थेट धमकी परदेशी मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्यामुळे या प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हुमायून कबीर यांना डिसेंबरमध्ये  तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी बेलडांगा येथे बाबरी मशिद बांधण्याचा प्रस्ताव दिला होता.

निलंबनानंतरही त्यांनी त्या मशिदीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला होता. स्थानिक मुस्लिम समाजातील काही गटांनी त्याला पाठिंबा दिल्याचे सांगितले जाते. यानंतर कबीर यांनी स्वतःचा जनता उन्नयन पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली.

ते पश्चिम बंगालमध्ये इस्लामिक विचारसरणीच्या पक्षांची मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे, ज्याद्वारे ते तृणमूल आणि भाजप दोघांनाही आव्हान देऊ इच्छितात. अलीकडील निवडणुकांमध्ये त्यांनी नौदा आणि रेजिनगर मतदारसंघांत विजय मिळवला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version