घरधर्म संस्कृतीश्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत जल्लोषात येणार

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत जल्लोषात येणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा

- Advertisement -

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या सोमवार १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार असून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत होणार आहे. तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडेल.

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकली असून नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी लंडन येथे ही तलवार ताब्यात घेतली. १८ ऑगस्टला ती मुंबईत दाखल होईल.

विमानतळ प्राधिकरणाकडून आंतरराष्ट्रीय विमानतळ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार सकाळी १० वाजता ही ऐतिहासिक तलवार स्वीकारतील. त्यानंतर विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन चित्ररथावर विराजमान करुन ही तलवार पु. ल. देशपांडे कला अकादमीकडे नेण्यात येईल. बाईक रॅलीही यावेळी काढण्यात येईल.

हे ही वाचा:

शुभांशू शुक्ला यांचे भारतात परतल्यानंतर भव्य स्वागत

पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर! 300 हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

जाडी अनेक आजारांचे मूळ

भारताच्या पर्यटन क्षेत्राचे उत्पन्न बघा किती वाढणार !

दरम्यान, संध्याकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्य विभाग,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय
सांस्कृतिक कार्य संचालनालय, पु.ल. देशपांडे कला अकादमी तर्फे “सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन” सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान तथा पालक मंत्री, उपनगर जिल्हा ॲड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.

तर श्रीमंत राजे रघूजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले विशेष उपस्थिती राहणार असून सांस्कृतिक कार्य विभाग.सचिव डॉ. किरण कुलकर्णी, ( भा.प्र.से ) यांच्यासह
स्थानिक खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार, महेश सावंत, यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

उद्या, सोमवार, १८ आँगस्ट २०२५, सायंकाळी ६:०० वाजता, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे हा होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन,पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे, पु.ल.देशपांडे
महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि सांस्कृतिक संचनालयाचे संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.

तलवारीचे प्रदर्शन

श्रीमंत सेना साहेब सुभा रघुजीराजे भोसले यांच्या इंग्लंडमधून आलेल्या तलवारीचे व बारा वारसा मानांकित गडकिल्ल्यांच्या माहितीचे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट २०२५, सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान, पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथील कला दालनात सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांनसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version