घरदेश दुनियानव्या कोरोनाच्या संशयाने जग हादरले!!

नव्या कोरोनाच्या संशयाने जग हादरले!!

ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा घातक प्रकार समोर आला आहे. या नव्या विषाणूचा फैलाव फार झपाटयाने होत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ब्रिटन मध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले गेल्येत. नव्या विषाणूच्या वृत्ताने जगभरात हडकंप माजला आहे.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी याविषयीची माहिती दिली. या घोषणेनंतर ब्रिटनमधून बाहेर पाडण्यासाठी रेल्वे स्थानकांवर नागरिकांची गर्दी उसळली.

नवा विषाणू नियंत्रणा बाहेर जाण्याचा धोका ब्रिटनने वर्तवला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेल्जियम, नेदर्लंड्स सारख्या देशांनी ब्रिटन मधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. या यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे. भारत सरकारच्या आरोग्य खात्यानेही या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय आरोग्य सेवा संचालक असून, यात जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रोड्रिको एच.ऑफ्रिन सहभागी होणार आहेत.

भारतात कोरोनाची लस जानेवारीत उपलब्ध होईल असे अरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. अशातच हे नवे आव्हान उभे ठाकले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version