घरदेश दुनियाअमेरिकेला दोहा हल्ल्याबद्दल आधीच माहिती होती! काय सांगतोय अहवाल?

अमेरिकेला दोहा हल्ल्याबद्दल आधीच माहिती होती! काय सांगतोय अहवाल?

पूर्वकल्पना असल्याची बाब ट्रम्प यांनी जाहीरपणे नाकारली होती

ऍक्सिओसच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्रे हवेत असताना नव्हे तर जवळजवळ हल्ल्याच्या एक तास आधी, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या मित्र राष्ट्र दोहावरील हल्ल्याची माहिती देण्यासाठी फोन केला होता. पत्रकार बराक रविद यांनी खुलासा केला की, इस्रायली पंतप्रधानांनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कतारमधील हमास नेत्यांवर हल्ला करण्याच्या इस्रायलच्या योजनेची माहिती अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिली होती.

“किमान तीन इस्रायली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की नेतन्याहू यांनी सकाळी ८ वाजता ट्रम्प यांना फोन करून सांगितले की इस्रायल कतारमध्ये हमास नेत्यांवर हल्ला करण्याची योजना आखत आहे.” तसेच या संबंधीचे वृत्त देताच चौथ्या वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने रविद यांना संपर्क करून ही माहिती ९८ टक्के अचूक असल्याचे सांगितले. मात्र, फोन सकाळी ८ वाजता नव्हे तर, ७.४५ वाजता होता हीच माहिती केवळ चुकीची असल्याने ९८ टक्के सांगितले. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितले की, त्यांना या हल्ल्याची पूर्वकल्पना नव्हती. सोमवारी, त्यांना पत्रकारांनी या हल्ल्याबद्दल माहित होते का असे विचारले असता त्यांनी पत्रकारांना सांगितले, नाही, मला कल्पना नव्हती. तसेच दावा केला की, हल्ला सुरू झाल्यानंतरच कळवण्यात आले होते, त्यामुळे हस्तक्षेप करण्याची कोणतीही संधी उरली नाही. ट्रम्प प्रशासनाने असेही म्हटले आहे की व्हाईट हाऊसला क्षेपणास्त्रे हवेत असतानाच कळवण्यात आले होते.

हे ही वाचा : 

नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांचा कॉल; रशिया युक्रेन युद्धावर काय केले भाष्य?

भारत सरकारवर टीका करत शाहिद आफ्रिदी राहुल गांधींवर उधळतोय स्तुतिसुमने

पाकला पराभव झेपेना; टीव्हीवर सूर्यकुमार यादवबद्दल अश्लील भाषेत टीका

भारतीय क्रिकेट संघासाठी अपोलो टायर्स नवा प्रायोजक!

ऍक्सिओसच्या अहवालावरून असे सूचित होते की, हल्ला थांबवण्यासाठी वेळ मर्यादित असली तरी, पहिले बॉम्ब पडण्यापूर्वी ट्रम्प यांना नेतन्याहू यांच्याकडून वैयक्तिकरित्या माहिती मिळाली होती. ९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या इस्रायली कारवाईत कतारच्या राजधानीत जमलेल्या हमासच्या राजकीय नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात कतारच्या एका सुरक्षा अधिकाऱ्यासह गटाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा भाग नसलेले पाच हमास सदस्य ठार झाले, परंतु पाच वरिष्ठ हमास नेते लक्ष्यित असल्याचे मानले जात होते. या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील सर्व भागात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कतारने दोहा येथील बॉम्बस्फोटाचा निषेध करत सर्व आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे उघड उल्लंघन केले आहे आणि यामुळे कतारवासीयांच्या आणि कतारमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण झाल्याचे म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version