घरदेश दुनियालेबनॉनमध्ये इस्रायलचा मोठा घाव: आयडीएफकडून हुसेन सैफो शरीफ ठार!

लेबनॉनमध्ये इस्रायलचा मोठा घाव: आयडीएफकडून हुसेन सैफो शरीफ ठार!

आयडीएफने पोस्टकरत दिली माहिती 

इस्रायलने लेबनॉनमधील आणखी एका मोठ्या शत्रूचा खात्मा केला आहे. आयडीएफने (इस्रायली संरक्षण दल)  माहिती दिली आहे की, त्यांनी सीरियामधून इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणारा एक वरिष्ठ शस्त्रास्त्र विक्रेता हुसेन सैफो शरीफ याला ठार केले आहे. लेबनॉनमधील बालबेक प्रांतात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात शरीफ ठार झाला.

हुसेन सैफो शरीफच्या कारवाया इस्रायल आणि लेबनॉनमधील आंतरराष्ट्रीय करारांचे स्पष्ट उल्लंघन होतं, असेही आयडीएफने नमूद केले आहे.

हुसेन शरीफ कोण होता? 

हुसेन सैफो शरीफ हा लेबनीज शस्त्रास्त्रांचा एक वरिष्ठ व्यापारी होता. त्याच्या नेटवर्कद्वारे सीरियामधून इस्रायलविरोधी दहशतवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि संसाधने पुरवली जात होती. यामुळे इस्रायली क्षेत्रात हल्ले, हिंसाचार आणि अस्थिरता निर्माण झाली.

या नेटवर्कचे प्रमुख उद्दिष्ट इस्रायलविरुद्ध दहशतवादी कारवाया राबवणे आणि त्या वाढवण्यासाठी आवश्यक मदत पुरवणे हेच होते. या हेतूने, शरीफने सीरियामधून हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना शस्त्रांचा पुरवठा सुनिश्चित केला आणि त्यांच्यासाठी आर्थिक आणि लॉजिस्टिक पाठबळ दिले. दरम्यान, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version