घरदेश दुनिया‘मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेत सहभागी होण्याच्या सौदी अरेबियातील मॉडेलच्या दाव्याबाबत संभ्रम

‘मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेत सहभागी होण्याच्या सौदी अरेबियातील मॉडेलच्या दाव्याबाबत संभ्रम

सौदी अरेबियाची मॉडेल रुमी अल्काहतानी यांनी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत सहभागी होत असल्याचे जाहीर करून ती या देशातर्फे सहभागी होणारी पहिली महिला असल्याचा दावा गेल्या आठवड्यात केला होता. स्पर्धेच्या आयोजकांनी मात्र या वर्षीच्या स्पर्धेत या देशाची स्पर्धक सहभागी झाले असल्याचा दावा फेटाळला आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेची निवड प्रक्रिया अद्याप पार पाडलेली नसून अजून कठोर तपासणी प्रक्रिया सुरू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ‘सौदी अरेबिया हा देश या वर्षी भाग घेणाऱ्या देशांपैकी एक आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही सध्या फ्रँचायझी मिळवण्यासाठी संभाव्य उमेदवाराला पात्र ठरविण्याकरिता कठोर तपासणी प्रक्रियेतून जात आहोत आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी एका राष्ट्रीय संचालकाची नियुक्ती केली आहे,’ असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आणि आमच्या मंजुरी समितीने याला पुष्टी देईपर्यंत आमच्या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होण्याची संधी सौदी अरेबियाला मिळणार नाही, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा:

“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा

मिस सौदी अरेबिया रुमी अल्काहतानी हिने गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर या वर्षीच्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर हे विधान आले आहे. तिने दावा केला की, ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत सौदी अरेबियाकडून सहभागी होणारी पहिली स्पर्धक असेल. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून पोस्ट काढलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version