घरदेश दुनियाभारत आमचा मित्र; होर्मुझ भारतासाठी खुली होईल!

भारत आमचा मित्र; होर्मुझ भारतासाठी खुली होईल!

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी महत्त्वाची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग (सेफ पॅसेज) देण्याची तयारी दर्शवली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फथाली यांनी भारत हा “मित्र देश” असल्याचे सांगत भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाईल, असा संकेत दिला. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना फथाली यांनी स्पष्ट केले की भारत आणि इराण यांच्यात दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळण्याबाबत सकारात्मक घडामोडी लवकरच दिसतील. “भारत आमचा मित्र आहे. तुम्हाला दोन-तीन तासांत त्याचे परिणाम दिसतील,” असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जागतिक तणावातही भारताच्या विकासाचा वेग कायम

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य; नियम मोडल्यास कारवाई

घाबरून सिलिंडर बूक करू नका!, सरकारचे आवाहन

जागतिक अस्थैर्यात भारताचा १ लाख कोटींचा स्थिरीकरण निधी

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला आहे. या भागातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ल्यांच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत भारताने आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी इराणशी राजनैतिक पातळीवर संपर्क वाढवला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानली जाते. पर्शियन आखातातून जगभर तेल आणि नैसर्गिक वायू पाठवण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक तेल व्यापारातील मोठा हिस्सा या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीतील कोणतीही अडचण जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम करू शकते.

भारतासाठीही या मार्गाचे मोठे रणनीतिक महत्त्व आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी मोठा भाग होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो. त्यामुळे या मार्गावर तणाव वाढल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

माहितीनुसार, भारताने इराणशी चर्चा करून होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय जहाजांसाठी सुरक्षित मार्ग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. काही भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे मार्ग देण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version