घरदेश दुनियाहल्ल्यात जखमी झालेल्या इराणचे नेव्ही कमांडर तंगसीरी यांचा मृत्यू

हल्ल्यात जखमी झालेल्या इराणचे नेव्ही कमांडर तंगसीरी यांचा मृत्यू

आयआरजीसीकडून अधिकृत पुष्टी

इराणने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नेव्ही कमांडर अलीरेजा तंगसीरी यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणी वृत्तसंस्था IRNA च्या माहितीनुसार, तंगसीरी गंभीर जखमी झाले होते आणि त्या जखमांमुळेच त्यांचा मृत्यू झाला. २६ मार्च रोजी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ आणि त्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला होता की, इस्रायली सैन्याने एका ऑपरेशनमध्ये तंगसीरी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना ठार केले आहे. आता इराणकडून झालेल्या पुष्टीमुळे हल्ल्यात जखमी झाल्यानंतर तंगसीरी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे तंगसीरी यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, “बुधवारी रात्री (२५ मार्च) आयआरजीसी नेव्हीचे कमांडर मारले गेले. अलीरेजा तंगसीरी हे होर्मुज सामुद्रधुनीवर लक्ष ठेवून होते.”

नेतन्याहू यांच्याआधी संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही तंगसीरी यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली होती. त्यांनी म्हटले होते की, “बुधवारी रात्री एका अचूक आणि धोकादायक ऑपरेशनमध्ये आयडीएफने रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या नेव्ही कमांडर तंगसीरी आणि नेव्हल कमांडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार केले.” तंगसीरी यांच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम इस्रायली माध्यमांनी एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाला देत दिली होती. त्यानुसार, इराणच्या बंदर अब्बास शहरावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

अलीरेजा तंगसीरी हे आयआरजीसी नेव्हीचे प्रमुख होते आणि इराणच्या समुद्री लष्करी रणनीतीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जात होते. होर्मुज सामुद्रधुनीत जहाजांवर नजर ठेवणे आणि लष्करी कारवायांमध्ये त्यांची मोठी भूमिका होती. दक्षिण इराणमधील बुशहर प्रांतात जन्मलेले तंगसीरी यांनी इराण-इराक युद्ध आणि १९८० च्या दशकातील तथाकथित ‘टँकर वॉर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ते आयआरजीसी नेव्हीमध्ये सहभागी झाले. तंगसीरी यांनी बंदर अब्बास येथे आयआरजीसी नेव्हीच्या पहिल्या नेव्हल डिस्ट्रिक्टची जबाबदारी सांभाळली आणि २०१० ते २०१८ या कालावधीत उपकमांडर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी फोर्सच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळली.

हे ही वाचा:

दोन आमदारांची हत्या करणारा नक्षलवादी सुरेश शरण

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; प्रेयसीचे अवयव ठेवले फ्रिजमध्ये

बालेन शहा यांनी घातली विद्यार्थी राजकारणावर बंदी

बांगलादेशातून कट रचणारा शब्बीर लोनच्या मुसक्या आवळल्या

तंगसीरी यांच्या मृत्यूच्या पुष्टीसह, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे. या यादीत सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई, माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद, सुरक्षा प्रमुख अली लारिजानी, संरक्षण मंत्री अजीज नसीरजादेह आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर मोहम्मद पाकपूर यांसारख्या अनेक प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version