घरदेश दुनियाराष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसरा आणि विजयादशमीच्या भारतवासियांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, विजयादशमीच्या या शुभमुहूर्तावर सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा. दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो. या उत्सवातून आपल्याला नैतिकता, चांगुलपणा, सदाचार या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. तमाम भारतवासियांच्या जीवनात समृद्धी आणि प्रसन्नता यावी अशा मी शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर सगळ्यांना अनंत शुभेच्छा.

गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, अधर्म, अन्याय, असत्य व अत्याचार यावर धर्म, न्याय, सत्य आणि सदाचाराच्या विजयाचे हे पर्व आहे. आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा त्याग करून मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळावी. प्रभू श्रीराम सगळ्यांचे कल्याण करो!

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version