घरदेश दुनियातालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज

तालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज

रशियाने तालिबानचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन पाऊले उचलण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी रशियाने अफगाण सीमा भागात सैन्य अभ्यास घेण्याचे ठरविले आहे. रशिया आणि ताजिकिस्तान ने संयुक्तरित्या अफगाणिस्तानच्या सीमा भागात सैन्य पाठविले आहे. तर दुसरीकडे ताजिकिस्तान नेही तालिबानचा ठिकाणा लावण्यासाठी कंबर कसली आहे. ताजिकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमा भागात सैन्य अभ्यास केला. तालिबानच्या अफगाणिस्तानातील वाढत्या प्रभावामुळे ताजिकिस्तानने यापूर्वीच सीमा भागात २० हजार सैनिक तैनात केले आहे.

रशिया उज्बेकिस्तान आणि ताजिकिस्तानसोबत मिळून अफगाण सीमेवर सैन्य अभ्यास करण्याच्या तयारीत आहे. ताजिकिस्तानने यापूर्वीच एकदा येथे सराव केला. त्यांच्या राष्ट्रपतींनी तर सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

ताजिकिस्तानच्या राखीव सैनिकांपैकी १ लाख ३० हजार तर सक्रीय १ लाख सैनिकांनी अफगाण सीमा भागात सैन्य अभ्यास करून एका प्रकारे तालिबानला इशाराच दिला आहे. तसेच यावेळी ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान यांनी अफगाणिस्तानातील संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे म्हटले. तसेच सध्याच्या परिस्थितीत आमच्या लोकांसाठी शांतपूर्ण वातावरण निर्माण करणे हे आमचे प्राथमिक लक्ष्य असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा:

फडणवीस, राणे आणि दरेकरांचा आज कोकण दौरा

महाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

आपत्तीची दरड….

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

तालिबानने सध्या असा दावा केला आहे की, त्यांनी अफगाणिस्तानच्या ९०% सीमाभागावर कब्जा केला आहे. त्यामुळे ताजिकिस्तान सीमेवर असलेला बदक्शन भागाही तालिबानच्या ताब्यात आला आहे. त्यासाठीच ताजिकिस्तानने ही भूमिका घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version