घरदेश दुनियाहॉलिवूड अभिनेता स्टीफन बॉसची आत्महत्या

हॉलिवूड अभिनेता स्टीफन बॉसची आत्महत्या

हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळला

- Advertisement -

हॉलिवूड जगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता, डान्सर आणि डीजे स्टीफन बॉस आता या जगात नाहीत. स्टिफन बॉसने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्याचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला आहे. स्टीफन बॉस ‘द इलेन डी जोन्स’ आणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ सारख्या शोसाठी ओळखले जात होते. याशिवाय तो त्याच्या उत्कृष्ट नृत्यासाठीही प्रसिद्ध होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत पोलिसांना बॉसचा मृतदेह सापडला. दुसरीकडे, स्टीफन बॉसची पत्नी एलिसन हॉकर म्हणते की बॉस त्यांची कार न घेता घरातून निघून गेले, ही एक विचित्र गोष्ट होती, कारण बॉस कधीही त्यांच्या कारशिवाय कुठेही गेले नाहीत.

स्टीफन बॉसच्या अचानक जाण्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. तसेच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. स्टीफन बॉसने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याचेही रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!

‘मला जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे की माझे पती स्टीफन आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत. तो आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व देत असे. प्रेम त्याच्यासाठी सर्वस्व होते. तो आमच्या कुटुंबाचा कणा होता. तो एक चांगला पती आणि वडील होता. त्यांच्या चाहत्यांसाठीही ते प्रेरणास्थान होते. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच जाणवेल असे स्टीफनफन बॉसच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी एलेन हॉकर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. . याशिवाय

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version