घरधर्म संस्कृतीब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे पिंपरीत आयोजन

ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे पिंपरीत आयोजन

न्यूज डंका मीडिया पार्टनर

ब्राह्मण सामर्थ्य संमेलनाचे आयोजन २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून सात्यकी सावरकर यांचीही उपस्थिती असेल.

‘न्यूज डंका’ हा या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

हे ही वाचा:

बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

सत्तेत येताचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार

सोमवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी वायसीएम हॉस्पिटलजवळ, मेट्रो स्टेशनजवळ हा कार्यक्रम होणार आहे. ‘आपल्या शक्तीला जागरुक करा’ हे या कार्यक्रमाचे बोधवाक्य आहे. सकल ब्राह्मण समाजाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी यासंदर्भात सांगितले की, ब्राह्मण समाजाला सातत्याने लक्ष्य करण्यात आले, पण राष्ट्रहिताचा विचार केला तर ब्राह्मण समाजाने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे.ती ब्राह्मण समाजाची परंपरा राहिली आहे. तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाने आपली एकजूट दाखवून द्यायला हवी.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version