घरलाइफस्टाइलपेरूची साल आणि बिया म्हणजे आरोग्यासाठी वरदान! काय आहे फायदा?

पेरूची साल आणि बिया म्हणजे आरोग्यासाठी वरदान! काय आहे फायदा?

पेरू हे सर्वसामान्यपणे मिळणारे, स्वस्त आणि चविष्ट फळ म्हणून ओळखले जाते. अनेकजण पेरू केवळ व्हिटॅमिन ‘C’ साठी खातात. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते पेरूमध्ये असा एक माहित नसलेला फायदा आहे, जो आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

नसांची ताकद वाढवतो

बहुतेकांना माहीत नाही, पण पेरूमध्ये असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हे रक्तवाहिन्यांच्या भिंती मजबूत करतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच मेंदूला जाणारा रक्तप्रवाह सुधारतो. तज्ज्ञ सांगतात की, नियमित पेरू खाणाऱ्यांमध्ये नसांशी संबंधित थकवा आणि चक्कर येण्याचे प्रमाण कमी आढळते.

पेरूची साल आणि बिया- दुर्लक्षित पण गुणकारी

अनेक लोक पेरू खाताना त्याची साल काढून टाकतात. मात्र साल आणि बियांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच वजन नियंत्रणात मदत होते विशेष म्हणजे, पेरूच्या पानांची काढा (उकळून केलेले पाणी) मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानला जातो. त्वचा आणि केसांसाठीही वरदान मानले जाते. पेरूमधील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे वृद्धत्व रोखण्यास मदत करतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. केस गळती कमी होते तसेच टाळू निरोगी राहतो.

आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा पेरू खाल्ल्यास शरीराला अनेक लपलेले फायदे मिळू शकतात. मात्र, मधुमेह किंवा पोटाचे गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वस्त, सहज उपलब्ध आणि दुर्लक्षित असलेला पेरू हा केवळ फळ नसून संपूर्ण आरोग्याचा संरक्षक आहे. पुढच्या वेळी पेरू खाताना, त्यामागचा हा लपलेला फायदा नक्की लक्षात ठेवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version