घरलाइफस्टाइलबेलपत्रांमध्ये दडलेत अजब-गजब गुणधर्म! नव्या संशोधनातून मोठा खुलासा

बेलपत्रांमध्ये दडलेत अजब-गजब गुणधर्म! नव्या संशोधनातून मोठा खुलासा

बेल हे एक पवित्र आणि औषधी वृक्ष आहे, ज्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवरील उपचारासाठी केला गेला आहे. याचे फळ, पानं, मुळे आणि खोड — सर्वच औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. बेलाचा वापर योगसाधनेत, पचन सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो.

‘जर्नल ऑफ हर्बल मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की बेलपत्र कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यात आणि हृदयासाठी उपयुक्त ठरू शकते. बक्सरच्या डॉ. अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका टीमने उंदरांवर स्तनाच्या कर्करोगाचे मॉडेल वापरून बेलफळाचा प्रयोग केला, आणि त्यात ट्युमरचा आकार तब्बल ७९ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

उत्तर प्रदेशातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असं आढळलं की बेलपत्र दमा, अतिसार, इन्सुलिनची पातळी, केसांची मजबुती आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या दूधाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात उपयोगी ठरू शकतात.
बेलपत्रांमध्ये व्हिटॅमिन A, C, B6 यांसोबतच कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
सकाळी उपाशीपोटी बेलपत्र खाल्ल्यास मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.

जे लोक अपचन, अ‍ॅसिडिटी, आणि पोटात जळजळ यांसारख्या पचनाच्या तक्रारींनी त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी बेलपत्र अतिशय फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोटातील त्रास दूर होतात.
सकाळी उपाशीपोटी बेलपत्र चावून खाल्ल्यास पाचनतंत्र मजबूत होतं.

मधुमेह हा आजार असला तरी बेलपत्राच्या मदतीने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. यामुळे मधुमेहींनी नियमितपणे बेलपत्राचा आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरतो.
हिवाळ्यात मात्र याचं प्रमाण मर्यादित ठेवावं – जास्तीत जास्त एक बेलपत्र खाणं पुरेसं असतं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version