घरराजकारण‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून अरविंद सावंतांनी मागितली माफी

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून अरविंद सावंतांनी मागितली माफी

शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा केला होता उल्लेख

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन सी यांच्याविरोधात अपशब्द वापरला होता. अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी शायना एन सी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, अरविंद सावंत यांनी त्यांच्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

मुंबदेवी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत गेले होते. त्यावेळी त्यांनी इथे ‘इम्पोर्टेड माल’ चालत नाही, ओरिजनल माल चालतो असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आणि शायना एन सी यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली.

यानंतर अरविंद सावंत म्हणाले की, “मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख आशिष शेलारांनी केला होता. त्यांच्यावर कोणतीही तक्रारी केली नव्हती. ठाण्यातही एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने बलात्कार केला. पण त्याविरोधातही गुन्हा दाखल झाला नाही. वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झाला का? संजय राठोडसारखा व्यक्ती तुमच्यासमोर आहे. राम कदम, गुलाबराव पाटील यांच्याविरोधात काय गुन्हे दाखल झाले?” असं अरविंद सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “कोणाच्याही भावना दुखाव्यात, कोणत्याही भगिनीचा अवमान व्हावा असं माझ्या आयुष्यात मी कधी काही केलं नाही. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.”

हे ही वाचा:

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून संजय राऊतांकडून अरविंद सावंतांची पाठराखण

अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया सुरू

दिवाळीच्या रोषणाईला विरोध करणाऱ्या तळोजामधील इमारतीला नितेश राणेंनी दिली भेट

अरविंद सावंत यांनी ‘माल’ म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. अरविंद सावंत यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत ठाकरे गटाला धडा शिकवेल, असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले आहे. शायना एन सी यांनी २८ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबादेवीतून उमेदवारी दिली. मुंबादेवी जागेवर काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांच्या विरोधात शायना एनसी निवडणूक रिंगणात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version