घरराजकारणराऊत यांच्या अटकेबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या चालकाने वाटले पेढे!

राऊत यांच्या अटकेबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या चालकाने वाटले पेढे!

संजय राऊत यानी शिवसेना फोडली!

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यासंदर्भात विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसैनिक राऊत यांच्या विरोधात आंदोलने करत असले तरी एका शिवसैनिकाने मात्र पेढेच वाटले आहेत.

शिवसेनेचे प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे दिले आणि आनंद व्यक्त केला. संजय राऊत यांना तुरुंगात टाकल्याबद्दल प्रकाश राजपूत यांनी हे पेढे वाटले. राजपूत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चालक होते.

धुळ्यातून राजपूत हे दिल्लीत खास गेले होते. तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे दिले. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, संजय राऊत यांनी खूप चुकीचे केले. शिवसेना फोडली. संपवली शिवसेना त्यांनी. मी मोठ्या साहेबांकडे म्हणजे बाळासाहेबांकडे चालक म्हणून काम करत असे. १९९३-२००० या काळात मी चालक म्हणून काम केले. पण जे झाले ते चुकीचे झाले.

हे ही वाचा:

टिळकांचे शेवटचे छायाचित्र बाबुराव घारपुरे यांच्या कॅमेऱ्यात कैद…

मुंबईत ‘द फ्लॅग कॉपोर्रेशन’ अंतर्गत लाखो तिरंगे…

‘हिंदुत्वविरोधी कनिका धिल्लन लिखित ‘रक्षाबंधन’ बघू नका!’

५जी लिलावात रिलायन्स जिओची बाजी, लावली तब्बल ८८,००० कोटींची बोली

संजय राऊत यांच्यावर ईडीने या रविवारी कारवाई केली. सकाळी राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आणि तब्बल ९.३० तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याच रात्री त्यांना अटक करण्यात आली. शिवसेनेतील ४० आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडल्यावर शिवसेनेत मोठे भगदाड पडले आहे. याला संजय राऊत जबाबदार आहेत, अशी टीका केली जात आहे. या चालकानेही असाच पवित्रा घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version