घरराजकारणकाँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज १४ फेब्रुवारी रोजी निषेध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने- सामने येण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. सागर बंगल्याच्या परिसरातून पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतेले आहे. नाना पटोले यांच्याविरुद्ध हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. मात्र, परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक

जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे म्हटले आहे. तसेच आम्ही कायद्याचे पालन करणार आमचे कार्यकर्ते सागर निवासस्थानी येऊन बसतील, असेही ते म्हणाले. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार आणि प्रसाद लाड हे सध्या सागर बंगल्याकडे पोहचले असून हल्ल्याची भाषा करालं , तर आम्हीही तसेच उत्तर देऊ, असे प्रसाद लाड म्हणाले. आमच्या नेत्याबद्दल बोलाल तर अजून आक्रमक उत्तर मिळेल. अण्णा हजारे म्हणतात मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही. याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. महात्मा गांधी यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, असे प्रसाद लाड म्हणाले.

सागर निवासस्थानी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे हे देखील पोहचले होते. त्यांनी भाजप विरुद्ध घोषणा देताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version