घरराजकारण‘एफसीआर’सह चार विधेयके आली नाहीत, हीच आमची उपलब्धी – काँग्रेस

‘एफसीआर’सह चार विधेयके आली नाहीत, हीच आमची उपलब्धी – काँग्रेस

जयराम रमेश यांच्याकडून विरोधकांच्या भूमिकेचे समर्थन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी विरोधकांच्या भूमिकेचे समर्थन करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘एफसीआरए’सह चार महत्त्वाची विधेयके अधिवेशनात पुढे आली नाहीत, हीच काँग्रेस आणि विरोधकांची मोठी उपलब्धी आहे, असा दावा त्यांनी केला. विरोधकांच्या एकजुटीमुळे सरकारला आपल्या अजेंड्यावरील काही महत्त्वाची विधेयके पुढे नेता आली नसल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.

रमेश यांच्या मते, ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक, विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक आणि एफसीआरए दुरुस्ती विधेयक ही चार विधेयके या अधिवेशनात पुढे आणण्यात आली नाहीत. या विधेयकांवर विरोधकांनी सातत्याने आक्षेप घेत सरकारवर दबाव कायम ठेवला. त्यामुळे सरकारला ही विधेयके चर्चेसाठी किंवा मंजुरीसाठी पुढे नेता आली नाहीत, असा दावा त्यांनी केला.
हे ही वाचा:
घर पाहायला गेलेल्या दाम्पत्यावर पिटबुल कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांसाठी डोप टेस्ट अनिवार्य

‘शुद्धीकरणा’वरून खर्गे-नड्डा आमनेसामने

आरजी कर बलात्कार- हत्या प्रकरणात तृणमूल नेते निर्मल घोष अटकेत

या अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये अभूतपूर्व समन्वय राहिल्याचेही रमेश यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांच्या फ्लोअर लीडर्सच्या सलग १८ दिवस बैठका झाल्या. या बैठकांमधून सरकारविरोधातील रणनीती ठरवण्यात आली आणि विविध मुद्द्यांवर विरोधकांनी एकत्रित भूमिका घेतली.

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरही सरकारला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत मिळवता आले नाही, असा दावा रमेश यांनी केला. सरकारने विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र विरोधकांची एकजूट कायम राहिल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे त्यांनी म्हटले.

संसदेचे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प राहिल्याने सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर टीका होत असली, तरी काँग्रेसने त्याकडे आपल्या राजकीय रणनीतीचे यश म्हणून पाहिले आहे. सरकारला महत्त्वाची विधेयके पुढे नेता आली नाहीत, विरोधकांची एकजूट कायम राहिली आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यात आला, हेच या अधिवेशनातील काँग्रेसचे यश आहे, अशी भूमिका जयराम रमेश यांनी मांडली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version