घरराजकारणजयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

शिवसेना नेते संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे भाजपासोबत येणार होत म्हणून हा विस्तार थांबला होता, असं संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

“भाजपाबरोबर जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चा झाली होती. आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे, आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता,” असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे. जयंत पाटील यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही, असंही वक्तव्य संजय शिरसाट म्हणाले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील शिरसाट यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून केलेल्या आरोपाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, “राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम नाही. कोण्या पक्षाचा हा कार्यक्रम नाही. राम मंदिर उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात लागलेला आहे. हा एक आनंदाचा क्षण असून, त्यात मिठाचा खडा कोणी टाकु नये,” असे संजय शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा:

नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!

२२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करूयात!

ठाण्यात रेव्ह पार्टी उधळली; १०० तरुणांना घेतलं ताब्यात

गोव्यात काँग्रेस, ‘आप’ला सनातन धर्माची चिंता!

तसेच सध्या चर्चेत असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाऊ देणार नाही, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. पाणबुडीचा उद्योग गुजरातला गेल्याची बातमी आली असली तरीही याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु, महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची चर्चा होतांना दिसत नाही. पण, पाणबुडीचा प्रकल्प राज्यबाहेर जाऊ देणार नाही. यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. त्यासाठी पाऊल टाकण्याचे काम या सरकारने केलेल आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version