घरराजकारणचंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्रच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, मोदींनी मारली मिठी!

चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्रच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, मोदींनी मारली मिठी!

पवन कल्याण झाले उपमुख्यमंत्री

तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (१२ जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.तर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित होते.

चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह २३ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये टीडीपीचे १९, पवन कल्याणसह जनसेनेचे ३ आणि भाजपचा एक मंत्री आहे.तर एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना मिठी मारत त्यांचे अभिनंदन केले.तसेच चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आणि टीडीपीचे महासचिव नारा लोकेश यांनी सुद्धा मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

हे ही वाचा:

आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं

वक्फ बोर्डाला निधी देण्याच्या निर्णयाला विहिंपचा विरोध

जम्मू-काश्मीरच्या कठुआत चकमक, एक जवान हुतात्मा!

हिंदू यात्रेकरूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन

दरम्यान, आंध्रप्रदेशात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने १७५ पैकी १६५ जागांवर विजय मिळविला होता.यामध्ये नायडू यांच्या टीडीपीला १३५ जागा, पवन कल्याण यांच्या जनसेनेला २१ तर भाजपाला ८ जागा मिळाल्या होत्या.टीडीपी , जनसेवा आणि भाजप या तिन्ही पक्षांनी मिळून जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारचा पराभव केला.या निवडणुकीत रेड्डी यांच्या YSRCP ला केवळ ११ जागांवर विजय प्राप्त झाला.तर काँग्रेसने येथे खातेही उघडले नाही.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version