घरराजकारणतुम्ही पाटील आहात, जोशीबुवांचे काम करू नका!

तुम्ही पाटील आहात, जोशीबुवांचे काम करू नका!

- Advertisement -

छगन भुजबळ यांनी केला जातीय उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा, समर्थकांचा ब्राह्मणविरोध लपून राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देताना ब्राह्मणांना टोमणा लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना म्हटले होते की, येत्या १० मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आहे. चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना झोंबले आहे. त्यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, तुम्ही पाटील आहात, जोशीबुवांचे काम कधीपासून करायला लागलात?

भुजबळ पुढे म्हणाले की, देशातील अनेक ठिकाणची सरकारे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यात यश मिळणार नाही. गोव्यात भाजपा सोडून सगळे सत्तेत येतील.

हे ही वाचा:

जो बायडन यांचा रशियाला गंभीर इशारा

हिजाब हा इस्लामचा भाग नाही; केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे परखड मत

‘मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही’

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार १० मार्चनंतर पडेल. पोलिसांच्या बदल्यांबाबत सीताराम कुंटे यांनी म्हटले होते की, त्यांना तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती. तर देशमुख यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबात म्हटले होते की, त्यांना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब हे याची पाठवत होते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तर थेट उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडून दबाव येत असल्याचे म्हटले होते. सचिन वाझेला पुन्हा नोकरीवर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून दबाव होता, असे ते म्हणाले होते. ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडीला सत्ता सोडावी लागेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version