“इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.” – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

“इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.” – केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

“इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या दलित व्यक्तींना दलितांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवता येणार नाही. तसेच आरक्षणाचे फायदेही मिळणार नाहीत.” अशी माहिती कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

भाजपाचे खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद म्हणाले की, “हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीय दलितांना या आरक्षित जागांवर निवडणूक लढवता येईल. तसेच आरक्षणाचे इतर लाभही मिळतील.”

मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित असलेल्या जागांवर निवडणूक लढवण्याचा पात्रतेवर बोलत असताना रवी शंकर प्रसाद म्हणाले की,” अनुसूचित जातींच्या निर्देशातील तिसऱ्या परिच्छेदात असे लिहिले आहे की, हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीय सोडून इतर कोणत्याही धर्मातील अनुसूचित समाजातील व्यक्तीला अनुसूचित समाजातील मानले जाणार नाही.”

केंद्रीय कायदे मंत्र्यांच्या या वक्तव्यातून हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीय दलित आणि इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले दलित यांच्यातील फरक अधोरेखित झाला आहे.

अनुसूचित जाती आणि जनजातीच्या कायद्यामध्ये कोणताही बदल करून इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या दलितांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी कोणताही कायदा आणण्याचा विचार नाही.

Exit mobile version