घरक्राईमनामासकाळी ९ चा भोंगा बंद करा अन्यथा... संजय राऊतांना धमकी   

सकाळी ९ चा भोंगा बंद करा अन्यथा… संजय राऊतांना धमकी   

ठाकरे गटाचे खासदार संजय राउत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राउत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बाब उघडकीस आली आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकाच दिवसात महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्या फोनवर संजय राऊत यांना धमकी देण्यात आली. याची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली आहे. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत असून त्याने संजय राऊत यांना सकाळी ९ चा भोंगा बंद करायला सांगा, त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अन्यथा त्यांना गोळी मारु, अशी धमकी दिली आहे. महिन्याभरात दोन्ही भावांना गोळी मारुन स्मशानात पोहचवणार असल्याचेही धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

संजय राऊत आणि सुनील राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. सुनील राऊत यांनी यासंदर्भातील ऑडियो क्लिप मुंबई पोलिसांना दिली आहे.

हे ही वाचा:

चार वर्षांत ४ कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण!

लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार

मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण

अमेरिकेतील सभांमध्ये राहुल गांधींच्याभोवती जिहादीं गटांचे कोंडाळे

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या अकाऊंट वरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचाही दाभोलकर होणार,’ असं लिहून धमकी देण्यात आली आहे. तसेच, शरद पवारांना अश्लाघ्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच यासंदर्भात गृहविभागाने लक्ष घालण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version