घरराजकारणसावरकरांचा अपमान करण्याची राहुल गांधींची परंपरा काँग्रेस नेते पुढे नेतायात

सावरकरांचा अपमान करण्याची राहुल गांधींची परंपरा काँग्रेस नेते पुढे नेतायात

कर्नाटक मंत्र्यांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची टीका

कर्नाटक सरकारमधील आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत गरळ ओकली आहे. वीर सावरकर हे ब्राह्मण होते, परंतु गोमांस खायचे, त्यांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही, असं विधान दिनेश गुंडुराव यांनी केलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काँग्रेस मंत्र्यांनी केलेल्या या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “सावरकरांविषयी वक्तव्य करणाऱ्यांना सावरकरांविषयी काहीही माहिती नाही. काँग्रेसकडून वारंवार वीर सावरकर यांचा अपमान केला जात आहे. गायीबाबत वीर सावरकरयांनी त्यांचे विचार मांडले आहेत. शेतकऱ्याला त्याच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत गाय ही त्याला मदत करते. त्यामुळे तिला ईश्वराचा दर्जा दिला आहे. पण, वीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधींनी चुकीची वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे आणि आता काँग्रेसचे नेते हीच परंपरा पुढे नेताना दिसत आहेत,” असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली आहे.

हे ही वाचा : 

आसाम पोलिसांनी १४ बांगलादेशी पकडले, ९ जणांकडे मिळाले आधारकार्ड!

केकमधून कॅन्सर?? बेंगळुरुत केकच्या १२ नमुन्यात सापडले घटक!

सावरकरांबाबत काँग्रेसची वाह्यात बडबड सुरूच!

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!

काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले राजकीय आत्मचरित्र ‘फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’मध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मनात उच्च कोटीचा आदर असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली आहेत. पण, दुसरीकडे काँग्रेसकडून सावरकरांचा द्वेष करण्याचे काम सुरूचं आहे. एका कार्यक्रमात कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी बोलताना म्हटले की, सावरकरांबद्दल लोक असेही बोलतात ते ब्राह्मण होते, मात्र उघडपणे मांस खायचे आणि त्याचा प्रचारही करत होते. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृती परंपरेवर विश्वास ठेवणारे होते, ते कट्टर शाकाहारी होते ते सर्व दृष्टीने लोकशाहीवादी व्यक्ती होते. सावरकरांची विचारधारा वेगळी होती त्यांनी कधी गोहत्येचा विरोध केला नाही असं त्यांनी म्हटलं. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version