घरराजकारणजंतर-मंतरवरील आंदोलन हा ‘फ्लॉप शो

जंतर-मंतरवरील आंदोलन हा ‘फ्लॉप शो

संबित पात्रा यांनी राहुल गांधींवरही केला आरोप

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित करण्यात आलेले आंदोलन म्हणजे शहराला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न होता; मात्र, हे आंदोलन अखेर ‘फ्लॉप शो’ ठरले, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी शनिवारी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परदेशी शक्तींशी संगनमत करून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी पोहोचलेल्या शेकडो तरुणांसह अनेक राजकीय नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. हा लोकशाहीचा जमावशाहीवरील विजय असल्याचे त्यांनी म्हटले.

राहुल गांधी अकार्यक्षम

भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ‘नालायक’ नेता असा केला. शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांवरही पात्रा यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रपतींनी ‘इंडिया’ आघाडीचे ‘व्होट चोरी’चे आरोप फेटाळले नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई

वेगवान गोलंदाज विल ओ’रूर्के भारत दौऱ्यातून बाहेर

‘कॉक्रोच’ना ताब्यात घेतल्यावर प्रवासी म्हणाले, स्वच्छ भारत अभियान

लोकांना आता राग येतोय !

संबित पात्रा म्हणाले, “जंतर-मंतरवर जे घडत आहे आणि दूरचित्रवाणीवर तसेच विविध समाजमाध्यमांवर जे दाखवले जात आहे, ते भारताचे खरे चित्र नाही. भारत शांततापूर्ण देश आहे आणि सुशासनाच्या माध्यमातून देश पुढे जात आहे.”

या आंदोलनाच्या माध्यमातून देशाची राजधानी दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण भारताला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पात्रा पुढे म्हणाले की, आंदोलनादरम्यान हिंसाचार भडकवण्याचे, शारीरिक संघर्ष घडवून आणण्याचे आणि रस्त्यांवर लढाईसदृश परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, हे आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरले.

“लोकशाहीने जमावशाहीवर विजय मिळवला आहे. आज दिल्लीत लोकशाहीने ज्या प्रकारे आपले सामर्थ्य दाखवले आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात राहिली, त्यावरून अराजकतावाद्यांचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. त्यांचा हा फ्लॉप शो यशस्वी झाला नाही,” असे पात्रा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version