घरराजकारणलिएंडर पेस भाजपच्या 'कोर्ट' मध्ये

लिएंडर पेस भाजपच्या ‘कोर्ट’ मध्ये

पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी तृणमूलला धक्का

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून भारताचे माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात हालचाली झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप नेते सुकांत मजूमदार यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. तसेच पेस यांच्या पक्ष प्रवेशाने तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना पेस यांनी भाजपाध्यक्ष नितिन नवीन यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती.

लिएंडर पेस हे यापूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होते. २०२१ मध्ये गोव्यात ममता बॅनर्जी यांनी स्वतः त्यांना टीएमसीमध्ये प्रवेश दिला होता. त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी पेस यांना “लहान भाऊ” म्हटले होते, तर पेस यांनी ममता बॅनर्जींना “खरी चॅम्पियन” म्हटले होते. मात्र टीएमसीमध्ये प्रवेशानंतर पेस यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे ते हळूहळू पक्षापासून दूर गेले, असे बोलले जाते. आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे टीएमसीसाठी हा मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या जवानांवर हल्ले; तिघांचा मृत्यू

कॅनडामध्ये खलिस्तानी प्रतीकांवर लगाम; सार्वजनिक प्रदर्शन दंडनीय

इराणच्या शस्त्रसाठ्यावर अमेरिकेकडून ‘बंकर बस्टर’ बॉम्बने हल्ला

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; आठ महिला ठार

लिएंडर हे कोलकात्याचे रहिवासी असल्याची बाब फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे नाव अनेकदा गोव्याशी जोडले जात असले तरी, लिएंडर यांचा जन्म आणि कोलकात्यातच झाला आहे. त्यांचे कुटुंब कोलकाता आणि गोवा या दोन्ही राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. यापूर्वी २०२१ मध्ये, गोवा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. तथापि, त्यांनी २०२२ ची गोवा निवडणूक लढवली नाही. या निवडणुकीत तृणमूलला एकही जागा जिंकता न आल्याने त्यांचा मोठा पराभव झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version