घरराजकारणनवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली

नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली

‘भंगाराचा धंदा करता करता नवाब मलिकांची मती भंगार मध्ये गेलेली आहे’ असा घणाघात भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या २-३ दिवसांपासून एनसीबीने कॉर्डीला क्रूज पार्टीवर केलेल्या कारवाईवर आक्षेप नोंदवताना दिसत आहेत. तर या कारवाई दरम्यान एका भाजपा नेत्यच्या नातेवाईकाला एनसीबीने सोडल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. यावरूनचा भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले पडळकर?
“नवाब मलिक यांना बीन बुडाचे आरोप करायची सवय लागली आहे. भंगाराचा धंदा करता करता त्यांची मती भंगार मध्ये गेलेली आहे. त्या क्रुज वरती १३०० प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये तुमचे जवळचेही कोणी लोक होते. एनसीबीने तपासानंतर ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला त्यांना अटक केली आहे. बाकीच्या सगळ्या प्रवाशांना सोडून दिलेले आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंनी राणेंच्या कानात काय सांगितले?

‘चिपी विमानतळाला विरोध कुणी केला हे लोक जाणतात’

संजय राऊत…काश्मीरात भाजपाने हे केले!

हज यात्रेला स्वस्तात पाठविण्याचे आमीष दाखविणारा पोलिसांच्या तावडीत

हे वसुली सरकार तुमच्या वसुलीत गुंग आहे. त्यामुळे एनसीबी असेल किंवा दिल्लीतील एटीएस असेल यांना महाराष्ट्रामध्ये कारवाई करावी लागते. तुमच्या जावयावरती कारवाई झाली आणि त्यांना अटक झाली तेव्हा तुम्ही एकही शब्द काढला नाही. तेव्हा तुम्ही गप्प होतात. पण तुम्हाला आर्यन शाहरुख खान याची चिंता लागून राहिली आहे. तुम्हाला त्याची चिंता लागून राहिलेली आहे की त्यांचे लागेबांधे तुमच्याकडे येऊन पोहोचत आहेत म्हणून तर तुमची झोप उडाली नाही ना?”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version