घरराजकारण'दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे'

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर ट्विटर आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक आरोप करत आहेत, पण आतापर्यंत त्यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.

दरम्यान, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘यंत्रणेचा एखादा प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्रात काम करू शकत नाही. दाऊद इब्राहीम हा आपल्या देशात नाही, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे.’ नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप करत आहेत.

हे ही वाचा:

फडणवीस खरे ठरले! जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट

हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!

नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

धक्कादायक! वर्गमित्राचीचं केली हत्या!

वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोपही नवाब यांनी केला आहे. वानखेडे यांचे वडील मुस्लिम असल्याचा आरोप नवाबांनी केला. मात्र, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते एका हिंदू वडिलांचे आणि मुस्लिम आईचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोपही केला असून पुढील एक वर्षात त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल, अशी धमकीही दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने एका क्रूझवर छापा टाकला होता. ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आर्यन खानच्या जामिनावर आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version