घरराजकारणकिरण रिजिजूंनी सांगितली 'दिमागी नक्षलीं'ची लक्षणे

किरण रिजिजूंनी सांगितली ‘दिमागी नक्षलीं’ची लक्षणे

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षल’ या शब्दाचा वापर केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी स्वतःला ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेतले आहे. आपल्याला दिमागी नक्षली असल्याचा अभिमान आहे, असे चिदंबरम म्हणाले. पण केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षातील नेत्यांना ‘दिमागी नक्षल’ म्हटलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.

रिजिजू यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये ‘दिमागी नक्षल’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, हा उल्लेख देशाच्या संविधानाला नाकारणाऱ्या, माओवादी विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या आणि फुटीरतावादी भूमिकांना समर्थन देणाऱ्या लोकांसाठी करण्यात आला होता.

हे ही वाचा:

आयफोन १८ प्रो मॅक्समध्ये असणार ५४००mAh बॅटरी, ४८MP कॅमेरा?

कियाच्या दोन नव्या एसयूव्हीची एंट्री

सोनिया गांधींची काय चूक? त्यांनी काँग्रेसची परंपराच जपली!

द्रविड-पुजारा यांच्या ‘खास क्लब’मध्ये पडिक्कल

रिजिजू यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ देत काही विशिष्ट प्रवृत्तींचा उल्लेख केला, ज्यांना दिमागी नक्षली म्हणता येते.

१) जे लोक माओवादाला पाठिंबा देतात आणि भारतीय संविधानाला नाकारतात.

२) जे फुटीरतावाद्यांच्या बाजूने उभे राहतात तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०च्या समर्थनाची भूमिका घेतात, ते

३) भारताच्या ईशान्य भागाला देशापासून वेगळे करण्यासाठी ‘चिकन्स नेक’ तोडण्याची भाषा करणारे.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींचा नेमका इशारा

१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी नक्षलवादाविरोधातील सरकारच्या कारवाईचा उल्लेख केला. जंगलांमध्ये शस्त्र हातात घेऊन हिंसाचार करणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचबरोबर त्यांनी ‘दिमागी नक्षल’ म्हणजेच नक्षलवादी मानसिकता असलेल्या व्यक्तींबाबत सावध राहण्याचे आवाहन केले.

मोदी यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रधारी नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला असला तरी नक्षलवादी विचारसरणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि संस्थांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. अशा प्रवृत्ती ओळखून त्यांना अलग ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version