घरराजकारणमुंबई महापौर- उपमहापौरपदाच्या उमेदवारांची घोषणा; कोणाची लागली वर्णी?

मुंबई महापौर- उपमहापौरपदाच्या उमेदवारांची घोषणा; कोणाची लागली वर्णी?

भाजपा आणि शिवसेनेने केली नावांची घोषणा

मुंबई महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता १५ दिवसांनी महापौर आणि उपमहापौरांची नावे जाहीर झाली आहेत. शिवसेना आणि भाजपाची संयुक्त बैठक होऊन महापौर आणि उपमहापौरांची नावे अंतिम करण्यात आली. त्यानुसार, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर पदासाठी आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी उपमहापौर पदासाठी नावे घोषित केली. त्यानुसार, भाजपाच्या रितू तावडे यांचे नाव मुंबईच्या महापौर पदासाठी अंतिम करण्यात आले असून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे.

अखेर मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स संपला असून भाजपच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून या नावाची अधिकृत घोषणा केली. तर मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडी यांची वर्णी लागली आहे.

शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खणकर उपस्थित होते. तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले उपस्थित होते.

हे ही वाचा:

अमेरिकेकडून इराणवर नवे निर्बंध; ऊर्जा क्षेत्राला केले लक्ष्य

भारत- अमेरिका करारामुळे ‘मेक इन इंडिया’ला मिळणार चालना!

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर गुगलची ऐतिहासिक झेप

‘वैभव’शाली विजय; युवा भारताने वर्ल्डकप जिंकला

मुंबई महापालिकेतील महापौर निवडीसाठीच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार आज ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज सादर करता येतील. तर येत्या ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापालिका मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा पार पडेल. यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडून मुंबईच्या नवीन महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version