घरराजकारणशहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

भारतीय शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करण्यात येतील असं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ भारत मिशन २.० ची सुरवात केली आहे.

स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत भारतातील शहरे कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे. अमृत मिशन ​​२.० चा उद्देश सांडपाणी प्रक्रिया वाढवणे तसेच सर्व घरांना १०० टक्के पाणी पुरवठा प्रदान करणे आहे.

शहरी जल सुरक्षेवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सांडपाणी आणि सेप्टिक व्यवस्थापनाचा विस्तार करणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात नाही हे सुनिश्चित करण्याचे लक्ष्य आहे. ते म्हणाले, “जेव्हा सांडपाणी प्रक्रिया वाढतील, तेव्हा शहरी पाणवठे स्वच्छ होतील आणि मग आमच्या नद्या देखील स्वच्छ होतील.”

दिल्लीतील गाझीपूर लँडफिलचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले: “दिल्लीमध्ये कचऱ्याचा असाच एक पर्वत वर्षानुवर्षे येथे आहे. दिल्लीची जनता हा पर्वत नष्ट होण्याची काढण्याची वाट पाहत आहे.” असे मोदींनी शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांना सांगितले. ते म्हणाले, “भारतातील या नव्या चळवळीमुळे असंख्य ‘ग्रीन जॉब्स’ निर्माण होतील.”

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात दररोज सुमारे १ लाख टन शहरी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. “२०१४ मध्ये भारतात २० टक्क्यांपेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. आता भारतत् दररोज जवळजवळ ७० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आम्हाला ते १०० टक्क्यावर नेले पाहिजे.” असं मोदी म्हणाले. स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.० साठी १.४१ लाख कोटींचा खर्च केला जाणार आहे.

हे ही वाचा:

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी

राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू

योगींनी कंगनाला दिली खास भेट! भेट पाहून कंगना म्हणाली…

” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलन आणि सामाजिक समता वाढवण्यासाठी कायमच शहरीकरणाचा पुरस्कार केला होता.” असंही मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version