घरराजकारणमोदी रेवंथ रेड्डींना म्हणाले, माझ्यासोबत या!

मोदी रेवंथ रेड्डींना म्हणाले, माझ्यासोबत या!

सोशल मीडियावर लिहिली पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद दौऱ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यावर हलक्याफुलक्या शैलीत टोला लगावला. या विनोदी संवादामुळे कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हैदराबाद येथे सुमारे ९४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी “गुजरात मॉडेल” प्रमाणे “तेलंगणा मॉडेल” उभारण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

हे ही वाचा:

कल्याण बॅनर्जींच्या नथीतून राऊतांचा आदित्य ठाकरेंवर तीर

१३ चेंडूत अर्धशतक! उर्विल पटेलची चेपॉकवर षटकारांची सुनामी

लग्नात ‘लेग पीस’वरून झालेल्या वादात तरुणाचा मृत्यू, एक जखमी

रेवंत रेड्डी म्हणाले की, जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी गुजरात मॉडेल विकसित केले. आता तेलंगणातील लोकांनाही अशीच अपेक्षा आहे की पुढील १० वर्षांत तेलंगणा १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाईल.

यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी विनोदी शैलीत म्हणाले, “मी रेवंत रेड्डींना सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने गुजरातला १० वर्षांत जे दिले, तेच मी तुम्हालाही देण्यासाठी तयार आहे.”

त्यानंतर त्यांनी मिश्कीलपणे जोडले; पण माझ्या माहितीनुसार, मी जर ते केले तर तुम्हाला सध्या जे मिळत आहे ते निम्मे होईल. त्यामुळे तुम्ही जिथे पोहोचू इच्छिता तिथे पोहोचू शकणार नाही. म्हणून माझ्यासोबत युती करणेच चांगले.”

हे ही वाचा:

या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला आणि स्वतः रेवंत रेड्डी देखील हसताना दिसले.

तेलंगणातील मोठे विकास प्रकल्प

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत गुडेबेल्लूर ते महबूबनगर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प सुमारे ३१७५ कोटी रुपयांचा असून त्यामुळे कर्नाटक सोबतची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवासाचा वेळ जवळपास दीड तासाने कमी होईल.

औद्योगिक कॉरिडॉर

झहीराबाद इंडस्ट्रीयल भागात या औद्योगिक क्षेत्राचा पाया देखील घालण्यात आला. हा प्रकल्प २३५० कोटी रुपयांचा असून सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

मोदींच्या हस्ते पीएम मित्र पार्कचे उद्घाटन करण्यात आले. हा भारतातील पहिला पूर्णपणे कार्यरत प्रेम पीएम मित्र पार्क  “Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign” या संकल्पनेवर आधारित आहे.

सिंधू हॉस्पिटल

पंतप्रधानांनी सिंधू हॉस्पिटल या आधुनिक कर्करोग उपचार केंद्राचेही उद्घाटन केले.

तेलंगणाच्या विकासासाठी केंद्राची बांधिलकी

मोदी म्हणाले की केंद्र सरकार तेलंगणाच्या विकासासाठी अधिक वेगाने काम करत राहील.

त्यांनी सांगितले की गेल्या १२ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर जवळपास १.७५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून तेलंगणातील राष्ट्रीय महामार्ग जाळे ११ वर्षांत दुप्पट झाले आहे.

रेल्वे क्षेत्रातील निधी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांनी नमूद केले. संयुक्त आंध्र प्रदेश काळात १००० कोटी रुपयांपेक्षा कमी निधी मिळत होता, तर आता तेलंगणासाठी जवळपास ५५०० कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. तसेच सध्या ५ कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version