घरराजकारणसंसदेत नाटकं नकोत, काम हवे

संसदेत नाटकं नकोत, काम हवे

हिवाळी अधिवेशनापूर्वी मोदींनी दिल्या विरोधकांना कानपिचक्या

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की संसद परिसरात नाटकं करण्यासाठी बाहेर अनेक जागा आहेत, पण संसदेच्या सभागृहात गोंधळाला जागा नाही. त्यांनी म्हटले की सभागृहात नाटकं नकोत, तर काम हवे.

पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना, विशेषतः विरोधकांना आवाहन केले की, त्यांनी सत्र सुरळीत आणि संसदेतची प्रतिष्ठा राखून ते चालविण्यासाठी सहकार्य करावे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसद ही देशाच्या आशा-अपेक्षांचे केंद्र आहे. त्यामुळे येथे घोषणाबाजी नव्हे, तर धोरणांवर गंभीर चर्चा व्हायला हवी. घोषणा नव्हे, धोरणावर भर द्यायला हवा आणि त्यासाठी नीयतही हवी.

हे ही वाचा:

हिवाळ्यात ही पाच फळे देतात जबरदस्त ऊर्जा

जीडीपी वाढीचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक

डास आणि कीटकांपासून त्रस्त आहात?

संसद अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक संपन्न

मोदी म्हणाले की, निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्यातून बाहेर पडायला हवे आणि रचनात्मक चर्चेत सहभागी व्हायला हवे. काही राजकीय पक्ष अजूनही बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल स्वीकारू शकत नाहीत, पण त्यासाठी संसद निराशेचे मैदान होता कामा नये. सत्र हे कोणाच्या पराभवाच्या नैराश्याचे किंवा कोणाच्या विजयाच्या अहंकाराचे आखाडे बनता कामा नये. नकारात्मकतेतून देशनिर्मिती होत नाही.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी युवा खासदारांना अधिक संधी देण्याची गरजही व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नव्या सदस्यांचे अनुभव आणि त्यांची नवी विचारसरणी देशासाठी उपयोगी ठरायला हवी. आपल्या तरुण पिढीची नवी दृष्टी सदनाला लाभदायक ठरावी आणि त्यातून देशाला नवीन कल्पना मिळाव्यात.

सर्व पक्षांना संदेश देताना पीएम मोदी म्हणाले, “माझी सर्व पक्षांना विनंती आहे की, हिवाळी अधिवेशन पराभवातून आलेल्या चीडचीडीचे मैदान बनू नये आणि हे सत्र विजयाच्या अहंकारातही परिवर्तित होता कामा नये. यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीही अशी आशा व्यक्त केली की, संसद सदस्य लोकशाहीच्या परंपरा मजबूत करण्यासाठी आणि हिवाळी अधिवेशन “उपयुक्त” बनवण्यासाठी मोलाचे योगदान देतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version