घरराजकारण'मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा'

‘मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा’

प्रवीण दरेकरांनी धरला निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात सभा घेतली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीला चांगलचं धारेवर धरलं होते. त्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंचे कौतुक करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा, असे म्हणत दरेकरांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

काल जितेंद्र आव्हाड यांच्यावर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून आज आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून दरेकरांनी आव्हाडांना धारेवर धरले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीकडून मुस्लिमचं लांगुलचालन केले जात आहे, राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि आपल्या इथे जातीचे राजकरण सुरु झाल्याच दरेकर म्हणाले आहेत. तसेच मुंब्य्रात कोंबिंग ऑपरेशन केले तर अनेक गोष्टी उघड होतील.

आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर आमच्याकडे येऊन तपास करा तुम्हाला साधा वस्ताराही सापडणार नाही असे म्हटले होते. त्यावर राज ठाकरेंनी सभेत त्यांना खणखणीत उत्तर दिले आहे. मात्र प्रवीण दरेकरांनी सुद्धा यावरुन आव्हाडांवर टीका केली.

हे ही वाचा:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील लीपिकाला गाडीने उडवले

संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना

श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार

यावेळी बाळासाहेब ठाकरे याच्या स्माराकाबद्द्ल भाजपाला कौतुक असल्याच सांगितल आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला जर दुसरी जागा हवी असेल तर ती मिळेल असही दारेकारांनी सांगितल. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे फक्त शिवसेनेचे नव्हते तर हिंदूंचे होते, म्हणून त्याचं व्यापक स्मारक झालं तर आम्हालाही आनंदच होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version