घरराजकारणयोगेंद्र यादवांच्या 'सलीम' नावाची पुन्हा चर्चा

योगेंद्र यादवांच्या ‘सलीम’ नावाची पुन्हा चर्चा

एका मुलाखतीदरम्यान, आम आदमी पार्टीचे माजी नेते योगेंद्र यादव यांना एक मुलगी विचारते की, तुम्ही तुमचे सलीम हे नाव का बदलले, ते तुम्ही का ठेवत नाही, तेव्हा आता आपल्याला नाव बदलण्याची गरज काय, असे उत्तर योगेंद्र यादव यांनी दिले. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

योगेंद्र यादव यांचे लहानपणी सलीम हे नाव ठेवण्यात आले होते. पण नंतर त्यांच्या त्या नावावरून त्यांना शाळेत चिडवले जात असे त्यामुळे त्यांनी ते नाव बदलून योगेंद्र हेच नाव लावायला सुरुवात केली. त्यावरूनच सदर मुलींनी त्यांना प्रश्न विचारला.

हे ही वाचा:

रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास!

स्थगिती नाही, सगळ्या निवडणुका होणारच!

टर्मिनल ब्रेस्ट कॅन्सरवरील पहिला राष्ट्रीय अंदाज जाहीर

चहाची चुस्की आणि आरोग्याची काळजी

ती मुलगी म्हणाली की, लहानपणी तुमचे नाव सलीम ठेवण्यात आले, मग तुम्हाला मुले चिडवत म्हणून तुम्ही ते बदलले. मग आता सलीम हे नाव पुन्हा धारण करायला काय हरकत आहे? त्यावर योगेंद्र यादव म्हणाले की, आता मी कशाला ते बदलू. तुम्ही तुमचे नाव बदलाल का ? यावर ती मुलगी म्हणाली की, मी कशाला नाव बदलू माझे नाव जन्मतःच जे आहे तेच आहे.

योगेंद्र यादव यांच्या आजोबांची हत्या मुस्लिम जमावाकडून झाली होती. १९३६ ला झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत शाळेत प्रवेश करणाऱ्या मुस्लिम जमावाला थांबवताना शाळेचे हेडमास्तर असलेल्या राम सिंग यांची हत्या केली गेली होती. त्यानंतर योगेंद्र यांच्या वडिलांनी सेक्युलरिझमच्या नावाखाली आपला मुलगा योगेंद्रचे नाव बदलून सलीम ठेवले तर त्यांची बहीण नीलमचे नाव बदलून नजमा ठेवण्यात आले. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर योगेंद्र यादव यांच्या वडिलांना असे वाटू लागले की, आपल्या मुलांची मुस्लिम नावे ठेवली तर दंगलीतून त्यांचा बचाव होईल. त्यामुळे ती नावे बदलण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version